एरंडोल तालुक्यातील नादखुर्द.खु येथे होणारा यात्रा महोत्सव रद्द

 एरंडोल प्रतिनिधी

नादखुर्द खु ता एरंडोल या गावात असलेले श्री दत्त मंदिर येथे दरवर्षी पौर्णिमेला दत्त गुरूंची यात्रा भरत असते मात्र या वर्षी दिनांक 27- 2 -2021 वार शनिवार रोजी होणारा यात्रा महोत्सव हा माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशाला आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे तरी भाविक भक्तगण यांनी मांडलेले नवस व मानता आणि यांचा निमित्ताने लागणारे सर्व प्रकारचे दुकाने यांना कुठल्याच प्रकारची परवानगी मिळणार नाही ग्रामपंचायत च्या वतीने जाहीर करण्यात आले कोरोना संसर्गजन्य महामारी साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये म्हणून सर्व प्रकारचे कार्यक्रम बंद करण्यात आले आहे व मंदिरात जास्त गर्दी होत नसल्यामुळे मंदिर सुद्धा बंद करण्यात आले आहे गावात येणारे प्रमुख पाहुणे यांनीसुद्धा गावात येऊ नये नागरिकांमध्ये नाराजी दिसत आहे परंतु पूर्ण संसर्ग रोखण्यासाठी व जिल्हाधिकारी यांचे आदेश त्यानुसार पालन करून आपण कोरणा संसर्ग ला आळा घालू शकतो असा निर्णय सर्वानुमते मंदिरा मार्फत घेण्यात आला आहे



Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या