एरंडोल प्रतिनिधी
एरंडोल शहरातील ड्रीम फिटनेस क्लब चे संचालक प्रा. संदीप सुरेश महाजन सर यांनी 'सुदृढ शरीरात सशक्त मन निवास करते'
म्हणुन "सुदृढ शरीर व निरोगी समाजाची निर्मिती" हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी एरंडोल नगरीमध्ये ड्रीम फिटनेस क्लब व्यायाम शाळेची स्थापना केली. व्यायामामुळे आत्मविश्वास वाढतो, अभ्यासात एकाग्रता राहते, आपल्याला इच्छित असलेले ध्येय पूर्ण करण्याची इच्छा शक्ती टिकून राहते. त्याचबरोबर त्यांनी आपल्या व्यायाम शाळेमध्ये देशसेवेचे कार्य करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, सैन्य भरती यासाठी तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना ते लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी परीक्षा यासाठी सखोल असे मार्गदर्शन करतात. त्यांच्या ड्रीम फिटनेस क्लब या व्यायाम शाळेचा विद्यार्थी घनश्याम सखाराम मराठे बोरगाव हा CRPF च्या परीक्षेमध्ये यशस्वी झाला त्याबद्दल ड्रीम फिटनेस क्लब चे संचालक प्राध्यापक संदीप सुरेश महाजन सर यांनी घनश्याम मराठे याचा ड्रीम फिटनेस क्लबच्या वतीने सत्कार केला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. घनश्याम मराठे या विद्यार्थ्याने व्यायाम शाळेतील इतर विद्यार्थ्यांना देखील जगातला प्रत्येक व्यक्ती आपले स्वप्न साकार करू शकतो फक्त त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची तयारी असायला हवी म्हणजे यश हमखास येते याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. संदीप सुरेश महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना "जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट प्रामाणिक इच्छाशक्ती सह हवी असते तेव्हा जगातील सर्व दृश्य व अदृश्य शक्ती हे तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी काम करीत असतात तसेच भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांची आठवण करून दिली की "स्वप्न ते नसते जे झोपल्यानंतर येते, स्वप्न ते असते की जे तुम्हाला झोपू देत नाही" भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. तर प्रा. जितेंद्र महाजन सर यांनी यशासाठी कुठलाही शॉर्टकट नाही त्याकरता जिद्दीने व चिकाटीने यशस्वी होईपर्यंत आपल्या स्वप्नाचा पाठलाग करा यश निश्चित मिळल बाबत मार्गदर्शन केले. सूत्र संचालन व आभारप्रदर्शन लोकेश मोराणकर याने केले.

0 टिप्पण्या