कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी
शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’अभियान उपयुक्त ठरेल आणि त्यातुन शेतकरी चिंतामुक्त होईल,असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'विकेलं पिकेल' या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले होते.मा.ना.श्री.दादाजी भुसे साहेब कृषि मंत्री महाराष्ट्र राज्य व वन मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे सचिव श्री.पाटील साहेब व जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे सचिव श्री.देशमुख साहेब यांना तीळ बियाणे तुर दाळ बॅग भेट देताना उमरे ता.एरंडोल येथील भवानी शंकर गटांचे अध्यक्ष श्री.भाऊसाहेब पाटील व आरोग्य सेवक तथा ग्रामपंचायत सदस्य श्री.सचिन पाटील...व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते व गावातील विविध विकासकामच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.



0 टिप्पण्या