जागतिक महिला दिनानिमित्त मानवसेवा प्रतिष्ठान च्या वतीने विधवा, परित्यक्ता, आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना साडी वाटप आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथील मानवसेवा प्रतिष्ठान च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनचे नियम पाळून विधवा, परित्यक्ता, आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मास्क, साडी वाटप आणि पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिवसेनेच्या महिला आघाडी अहमदनगर जिल्हा प्रमुख सौ. मंगलताई राजेंद्र म्हस्के तर प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्याध्यापिका संगिता भापसे,कोपरे गावच्या सरपंच छायाताई उघडे,हनुमान टाकळीच्या सरपंच मिनाताई शिरसाट, आदर्श उद्योजक शोभाताई पंडीत, मीराताई कातोरे,वर्षा कातोरे,वनिता कातोरे या होत्या. प्रथम अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पूजन करून सौ. नंदा व आदिनाथ गुंडसर यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. चित्रपट निर्माते विक्रममामा ससाणेआणि टीम यांनी थेट प्रक्षेपण केले.गोरगरिबांना साडी वाटपा बरोबरच गुणवंत महिलांना राज्य स्तरावरील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रुपालीताई कलोर(आदर्श महिला पोलीस),मिना मिसाळ(पोलिस मित्र),शिंधुगोडगे निकाळजे(आदर्श परिचारिका),जमुना पगारे(आदर्श वर्धिनी),रुथ बळिद(आदर्श अंगणवाडी सेविका),पार्वती शिंदे(बचतगट सुपरवायझर), अलका खाडे(आदर्श ख्रिश्चनधर्म सेविका),मिरा पवळे( आदर्श अंगणवाडी मदतनीस),वैष्णवी मिसाळ(आदर्श नर्सिंग सेवा),मिना बारसे(आदर्श ग्रुहिनी),मिना शिरसाट(आदर्श सरपंच).छायाताई उघडे(आदर्श दुबार सरपंच),वर्षाकातोरे (आदर्श लेडीज टेलर),संगिता भापसे(आदर्श मुख्याध्यापिका), शुभांगी बेंद्रे(आदर्श महिला सराफ),मीराताई कातोरे(आदर्श लेडीज टेलर शिक्षिका),सारिका काळपुंड(आदर्श गायिका),द्रोपदा मतकर(आदर्श माता),आलका मतकर(आदर्श अंगणवाडी सेविका),ईत्यादी पुरस्कार देऊन महिलांना गौरविण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुनिल मतकर सर यांनाही ग्लोबल चेंजमेकर पुरस्कार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्तेमुंबई येथे नुकताच प्रदान करण्यात आला.यावेळी शुभम मतकर,बाळासाहेब मतकर, मंदा वांढेकर, शोभा वांढेकर, योगिता पिसे,प्रमिला काळपुंड यांच्या सह जिल्ह्यातील मांन्यवर महिला उपस्थित होत्या.प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

0 टिप्पण्या