अंमळनेर प्रतिनिधी राहुल भदाणे
जागर स्त्री शक्तीचा जागतिक महिला दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम कृषि पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे संपुर्ण महाराष्ट्रात शेतकरी महिलेचा सन्मान करण्यात आला. खरंच तिचा कधीच सन्मान आज पर्यंत झाला नव्हता पण ती खरी त्या सन्मानाची खरी हकदार आहे.
हा उपक्रम कृषि पदवीधर युवाशक्ती संघटना अमळनेर तर्फे मंगरुळ गावात घेण्यात आला. गावातील शेतकरी महिलेचा सन्मान संघटनेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ. झाशी की राणी . अहिल्याबाई होळकर. सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. या वेळी गिरीष पाटील (जिल्हाध्यक्ष सोशल मिडिया). शुभम सुर्यवंशी (तालुकाध्यक्ष). दिशा पाटील ( युवती अध्यक्ष) प्रज्ञा पाटील(युवती उपाध्यक्ष) मयुर साळुंखे (जिल्हा कार्याध्यक्ष विद्यार्थी सेल ). छायेंद्र देशमुख (तालुका उपाध्यक्ष) देवेंद्र माळी (विद्यार्थी सेल अध्यक्ष) व निखिल शिंदे (सदस्य )व गावातली गाम्रस्थ उपस्थित होते.


0 टिप्पण्या