मानवसेवा प्रतिष्ठानचा "आदर्श महिला बचत गट पुरस्कार" कोपरेगावच्या अहिल्यादेवी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनिता घुले यांना प्रदान

अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी सुनिल नजन    

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मानवसेवा प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा राज्य स्तरावरील "आदर्श बचतगट पुरस्कार" कोपरे गावच्या अहिल्यादेवी महिला बचत गटासप्राप्त झाला असुन  गटाच्या अध्यक्षा सुनिता मारुती घुले यांना जागतिक महिला दिनाच्या दिवशी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा मंगलताई म्हस्के, मुख्याध्यापिका संगिता भापसे,शुभांगी बेंद्रे,मिनाक्षी मिसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कोपरेगावच्या दुबार सरपंच सौ.छायाताई भाउसाहेब उघडे, हनुमान टाकळीच्या सरपंच सौ.मिनाताई संजय शिरसाट, अहिल्यादेवी महिला बचत गटाच्या उपाध्यक्ष कमल कुसाळकर,सदस्य माया बोरुडे, ताराबाई खरात,सिष्टर अलका खाडे,वडुले येथील बचतगटाच्या प्रतिनिधी सारिका काळपुंड, प्रमिला काळपुंड,रुथा भालेराव, मंदा काळपुंड, संगिता पोळ,लता पवार,हिरा काळपुंड, अलका मतकर,अंबिका पाचे, सुनिता चक्रनारायण,मीरा पवळे,पार्वती शिंदे, वैष्णवी मिसाळ,शिंधु गोडगे, रुथा बळिद,यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक नामवंत महिला उपस्थित होत्या.आभार संस्थेचे अध्यक्ष सुनिल मतकर यांनी मानले.     



Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या