प्रा.आ.केंद्र तरवाडे ता.चाळीसगाव येथे मोफत जंतनाशक औषधी वाटप,किटकजन्य आजार,कुष्ठरोग,क्षयरोग सर्वेक्शन जनजागृती मोहीम.

चाळीसगाव प्रतिनिधी

दि.1 मार्च 2021 पासून महाराष्ट्र राज्यात मोफत जंतनाशक मोहीमेस सुरुवात झाली असून, मोहीम 8 मार्च 2021 पर्यंत असेल, मुलांच्या सुदृढ वाढीसाठी ,निरोगी आयुष्यासाठी जंत नाशक औषधी सर्व 1 ते 19 वयोगटातील लाभार्थी यांना दिले जाणे गरजेचे 

असल्याने,प्रा.आ.केंद्र तरवाडे अंतर्गत असलेल्या उपकेंद्र वडाळा आणि अंतर्गत गावात तसेच तरवाडे उपकेंद्र अंतर्गत  बोरखेडे गावात तसेच इतर सर्व गावात डॉ.भीमाशंकर जमादार-जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार, सौ.अपर्णा पाटील जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव,डॉ.देवराम लांडे तालुका आरोग्य अधिकारी चाळीसगाव, डॉ.अजय राजपूत वै. अधिकारी,डॉ.अस्मिता शिरसाठ वै.अधीकारी प्रा.आ.केंद्र तरवाडे, भागवत देवरे-आ.सहायक,हमीद पठाण आ.सहायक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चाळीसगाव,लुकराम तडवी हिवताप पर्यवेक्षक हिवताप पर्यवेक्षक कार्यालय चाळीसगाव,बी.के.पवार(आ.सहायक),डी.एम.महाजन(आ.सहायक),आय.झेड.परदेशी(आ.साहयिका) प्रा.आ.केंद्र तरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र वडाळा आणि अंतर्गत गावात तसेच उपकेंद्र तरवाडे  अंतर्गत बोरखेडे गावात मोफत जंतनाशक औषधी घरोघरी जाऊन आशा,अंगणवाडी सेविका,दिपक ठाकरे आरोग्य सेवक,वैशाली वाघ  आरोग्य सेविका हे  लाभार्थी यांना खाऊ घालत आहे. जंतनाशक औषधी जे महत्व सांगून जनजागृती करण्यात येत आहे.सोबत कुष्ठरोग, क्षयरोग सर्वेक्षण करण्यात येत असून जनजागृती करण्यात येत आहे.ध्वनीक्षेपकाद्वारे सर्व किटकजन्य,जलजन्य आजार तसेच जंतनाशक औषधी विषयी माहिती देण्यात येत आहे.हिवताप,डेंग्यू, चिकूनगुनिया इ.किटकजन्य आजारासंदर्भात पोम्लेट वाटप करून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे ...।

भागातील गावात आरोग्यपर म्हणी लिहण्यात येत आहे.या साठी ग्रामपंचायत कार्यालय,शिक्षकवृंद,ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभत आहे.



Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या