चाळीसगाव तालुक्यातील लोंढेचा शेतकरी सौदी अरेबियात

चाळीसगाव प्रतिनिधी चेतन सोनार

तालुक्यातील लोंढे येथीलआत्माअंतर्गत श्री शिवसमर्थ शेतकरी गटाचे अध्यक्ष शिवाजी निलकंठ निकम यांचा शेतकरी गट स्थापन करून देण्यात आला. सदर गटाने ‘विकेल ते पिकेल’ संत शिरोमणी सावता माळी अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. सदर गटामार्फत KNOWN YOU SEED (कुंदन) जातीचे खरबूजाची लागवड ३ एकर क्षेत्रावर करण्यात आली असून ३० रुपये प्रति किलो ने जागेवर भाव मिळत असून सदर माल सौदी अरेबिया येथे एक्स्पोर्ट केला जात आहे. जवळपास १५ टन माल निघण्याचा अंदाज आहे. पाहणी करताना तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे मंडळ कृषी अधिकारी सूर्यवंशी साहेब तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा ज्ञानेश्वर पवार

इतर भाजीपाला टोमॅटो १० टन १५ रुपये प्रति किलो व चवळी ९ टन २५ रुपये प्रति किलो विक्री चालू आहे

हया ‘विकेल ते पिकेल’ प्रकल्पास संभाजी ठाकूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव

अनिल भोकरे कृषि उपसंचालक जळगाव

मधुकर चौधरी डेप्युटी उपसंचालक आत्मा २

कुर्बान तडवी डेप्युटी उपसंचालक आत्मा २

यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या