जामनेर प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
पिंपळगांव कमानी ता. जामनेर जि.जळगाव शासन निर्णयानुसार गौण खनिज उत्खन साठा व अवैध वाहतूक नियंत्रणासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार पिंपळगाव कमानी गावाची ग्रामदक्षता समिती 5मार्च ला गठीत करण्यात आली. या समितीत सरपंच अध्येक्ष राहणार असून तलाठी सदेससचिव तर पोलीस पाटील, ग्रामसेवक कोतवाल हे सर्व समितीत असणार आहेत. या प्रसंगी सरपंच प्रियंका रामेश्वर चव्हाण उपसरपंच काळू राठोड, पोलीस पाटील इंदल चव्हाण, कोतवाल आकाश पाटील, विद्यमान शदेश कैलास चव्हाण, विद्यमान साडेसहा सईबाई रतन चव्हाण, अनुसया चव्हाण, चेतन चव्हाण, तारावन्ती राठोड, माजी सरपंच अर्जुन राठोड व ग्रामस्थ होते . या वेळी तलाठी गजानन सोमासे यांनी आपले मत वेक्त केलं की अवैध रित्या होणाऱ्या खनिजाच्या उत्खनामुळे सरकार महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. शिवाय वाळूचा हि उपसा बेकायदा उपसा होत आसल्याने यामुळे पर्यावरणाची हानी हि होत आहे. अनेकदा जळगाव जिल्हा प्रशासन आणि पोलीस मिळून संयुक्त रित्या गौण खनिज स्तरावर तस्करावर कारवाईचा बडगा उगारतात. मात्र या कार्यवाहीचाही कोणताही परिणाम होत नाही आणि गौण खनिजाची अवैध वाहतूक आजही सुरु असल्याचे चित्र आहे. अधूनमधून कारवाही मध्ये वारिष्टधिकाऱ्यासह जिल्हाप्रशाशनाची संपूर्ण यंत्रणा उतरते मात्र नंतर परिथिती जैसे थे वैशे हि असल्याचे चित्र असल्याने गावपातळीवर ग्रामदक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश सहायक जिल्हा अधिकारी तृपी धोडमिसे जळगावं, भाग जळगाव यांनी केले असल्याने सरपंच सौ प्रियंका चव्हाण यांच्या अध्येसेते खाली समिती गठित करण्यात आली. असून समिती वाळू, उत्खनन, माती, उपसा करत असतांना कोणी सापडल्यास त्यांच्या विरुद्ध कारवाही करण्यात येईल तसेज वेळ प्रसंगी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येईल.. तसेज ग्रामपंचायत पिंपळगाव कमानी येथील स्थानिक यंत्रणेने सहाय्यक जिल्हा अधिकारी तृप्ती धोडमिसे, जळगाव भाग व तहसीलदार अरुण शेवाळे व महसुली अधिकारी यांना सहकार्य करावे. तसेज पोलीस पाटील चव्हाण व तलाठी सोमासे यांनी वाळू माफियांना व अवैधरीत्या वाळू उपसा कारण्याऱ्यांची गय केली जाणार नाही.असा इशाराही दिला आहे.

0 टिप्पण्या