सावळदबारा येथे जागतिक महिला दिन साजरा

सोयगाव तालुका प्रतिनिधी:- अज्ञानसिंग चव्हाण

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे आज दिनांक 8 मार्च 2021 रोजी  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावळदबारा या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त सावळदबारा केंद्रातील कर्तबगार महिलांचा छोटेखानी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून केंद्रप्रमुख श्रीमती एस.बी. राठोड मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती एम. एस. पवार मॅडम, व्हि.जी सरकटे मॅडम, श्रीमती एन. एफ. हीरास, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका, आशा सेविका , अंगणवाडी सेविका, गावातील कर्तबगार महिला इत्यादी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती व्हि.जी सरकटे, यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती एन. एफ. हीरास यांनी केले याप्रसंगी केंद्रीय मुख्याध्यापक श्री एम. डी. सोनोने सर यांनी केंद्रप्रमुख व इतर कर्तबगार महिलांचा प्रश्न गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विदया सरकटे मॅडम यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री बी.जी. गायकवाड सर, श्री जे.के. गवई सर यांनी परिश्रम घेतले‌‌. श्रीमती केंद्रप्रमुख मॅडम यांनी आजवर स्त्रियांनी केलेल्या महान कार्याचे गौरव उदगार केले. स्त्रिया आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाही त्या पुरुषांच्या पुढेच आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीच असते असे श्रीमती एस.बि. राठोड मॅडम यांनी सांगितले. यानंतर श्री एम डी सोनोने सर यांनी सांगितले की आजच्या काळातील स्त्री ही खूप पुढारलेली आहे आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करते आहेच पण काही ठिकाणी पुरूषांच्या पेक्षा अग्रेसर आहेत. यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम सोशल डिंस्नंट नियमानुसार पार पडला.


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या