आदर्श गावचिलाणे येथील स्व .पितांबर भाऊ गजमल सोनवणे यांचे द्वित्तीय चिरंजीव स्व . बापूसाहेब दगाजीराव पितांबर सोनवणे यांचे नातू व श्री . रविंद्र दगाजीराव सोनवणे ( राजू दादा ) व सौ निलिमा रविंद्र सोनवणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि . अमेय रविंद्र सोनवणे एम बी ए हा कॅनेडा येथे कॉनफेडरेशन कॉलेज थंडर बे येथे दोन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी परदेशात दि .२६ रोजी सांताक्रुझ मुंबई येथून प्लेनने गेला .पितांबर भाऊ म्हणजे अत्यंत साधे सामान्यातुन असमान्यान व्यक्तीमत्व तसेच चिलाणे गावाचे काही काळ गावाचे न्याय मुखिया म्हणून जबाबदारी सांभाळली होती .परंतू अन्याय मुळीच सहन न झाल्याने त्या पदाचा त्याग भाऊंनी केला होता . अत्यंत वाईट परिस्थितीतुन दोन मुले शिक्षक बनविले . गावातील प्रथम शिक्षक होण्याचा मान मिळविला पितांबर भाऊंचे मोठे सुपुत्र स्व . आप्पासाहेब रामदास पाटील हे शेती पाहण्यासाठी घरी होते . त्यांनी घरची सामाजिक जबाबदारी सांभाळावी . तसेच भाऊंना एक कन्या सौ .निर्मलाताई अत्यंत हुशार व मनमिळावू स्वभाव त्या सुध्दा जिल्हा परिषद सदस्य , बांधकाम समिती धुळे येथे राजकारणात होत्या . लहान सुपुत्र स्व . आण्णासो पंढरीनाथ पाटील हे दादासाहेब रावल हायस्कूलला उत्कृष्ट गणिताचे शिक्षक होते . अश्या सुसंकृत कुटुंबातील प्रा रविंद्र पाटील व सौ . निलिमा पाटील हे देखील उच्च शिक्षित असून त्यांचा सुपुत्र अमेय कॅनेडा येथे गेला . तसेच लहान सुपुत्र चि . अभिषेक देखील सिबॉयसिस विद्यापीठातून सिस्टीम एन्ड फायनंन्स मधुन एम बी ए झाला आहे .खरच या कुटुंबाला दिवाळीहून अधिक आनंदित वाटणारा दिवस ठरला .जीवनात अनेक कटू प्रसंगातून मार्ग काढतांना शिक्षणाच्या बळावर यशस्वी होणे म्हणजे शिखर गाठणेच . राजू दादाचे दोघ पोर वेल एज्यूकेटेड आहे . अर्थात पितांबर भाऊंचे कुटुंबाने शिक्षणाच्या बाबतीत उंच भरारी घेतली आहे . स्व . डि पी पाटील ( बापू ) यांनी प्रताप कॉलेज अमळनेर येथे एम ए ला प्रथम क्रमांक पटकाविला . बापूंना एक कन्या सौ . भारती ताई तिने पण उच्च शिक्षण घेतले होते . घरची जबाबदारी होती म्हणून ती गृहीणी राहिली व मोना व युगाला दोघा बहिणींना इंजिनियर करून नोकरी लावून जीवन यशस्वी करून दाखविले त्यात कापडणे येथील श्री . भाऊसाहेब गुणवंतराव बोरसे( उपसमाज कल्याण अधिकारी मुंबई ) यांची साथ होती . बापूंनी .एरंडोल येथील नामांकित अशा रा . ति . काबरे विद्यालयात शिस्तबध्द व इमामदारीने सेवा बजावली . ते एन सी सी चे कंमांडर शिक्षक होते . आज त्यांचा नातू कॅनेडा येथे उच्च शिक्षणासाठी गेल्याने सर्व कुटुंब खूप आनंदी झाले आहे .पितांबर भाऊंच्या कुंटुबाच्या बाबतीत खूप काही सांगावासे वाटते . पण वेळेचा अभाव तसेच आजचा दिवस त्यांचा द्विगुणीत आनंदाचा आहे . अमेय कॅनेडा येथून प्रशिक्षण घेऊन आपल्या भारत देशासाठी सेवा करावी . हिच इच्छा . भावी आयुष्याच्या त्याला मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छ
शप्रमोद पाटील चिलाणेकर ( मुख्याध्यापक ) तथा जिल्हाध्यक्ष भारतीय मराठी साहित्य परिषद जळगाव व मित्र परिवार मार्फत हार्दिक शुभेच्छा
0 टिप्पण्या