कासोदा|प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी
कासोद्या नगरीचे आराध्य दैवत प.पूज्य.सद्गुरु श्री गोविंद महाराज यांच्या सप्ताह निमित्त आज दि. २९ ऑगस्ट रोजी पहिली मिटिंग घेण्यात आली. यात अध्यक्ष , उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार यांची निवड करण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गोविंद महाराज यांच्या ६८ व्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन पंच मंडळ व ग्रामस्थांतर्फे करण्यात येणार असून .
यासाठी मिटिंग बोलावण्यात आले होती , मागील वर्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा या मिटिंग मध्ये दिला असून, यावर्षी
शिवसेना उप ता.प्रमुख रविंद्र संतोष चौधरी यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर , उपाध्यक्षपदी निलेश बालकीसन अग्रवाल व माधवराव भाऊलाल खैरनार यांची तर सचिव पदी शैलेश पांडे व संतोष चौधरी यांची, व खजिनदार पदी व्यवस्थापक संजीव नवाल यांची आजच्या मिटिंग मध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सप्ताह पंच मंडळाने यावर्षी नव्याने व युवा नेतृत्वांवर कारभार सोपविला आहे. याप्रसंगी सप्ताह पंच मंडळाचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यानिवडी बद्दल सप्ताह पंच मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.







0 टिप्पण्या