मागील वर्षाच्या रब्बी हंगामातील ज्वारी खरेदी केंद्राला मुदत वाढ मिळण्याची मागणी - तहसिलदारांना निवेदन


आडगाव ता .एरंडोल : -सन २०२० ते२०२१ या वर्षातील रब्बी हंगामातील  शेतकऱ्यांची ज्वारी घरात पडून असल्याने शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे , शेतकरी हवादिल झाला आहे . ज्वारी घरात पडली असल्याने शेतकरी बांधवांना झड सोसावी लागत आहेत म्हणून एरंडोल तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा मत्री छगन रावजी भुजबळ महाराष्ट्र शासनास निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे . त्या संदर्भातील निवेदन एरंडोल निवासी नायब तहसिलदार सुरेश शिरसाट यांच्या मार्फत शासनास देण्यात आले आहे . सन २०२० -२१ च्या रब्बी हंगामातील ज्वारी केंद्रास मुदत वाढ देऊन शेतकऱ्यांची समस्या दुर करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील ( उमरे ) तालुका सरचिटणीस अनिल पाटील ( आडगाव ) सह परिसरातील राजू फणसे , बापू महाजन , दिपक पाटील , साहेबराव पाटील , निंबा ठाकरे , नबी खाटीक , लतीप खाटीक , आदि शेतकरी बांधवांनी सह्या करून निवेदन सादर केले .

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या