अंमळनेर येथे खड्ड्यात झाडे लावून मुन वॉक ऑन अर्थ...!अनोखे आंदोलन...!

तालुका अमळनेर प्रतिनिधी राहुल भदाणे
सार्वजनिक बांधकाम विभाग  आणि नगरपरिषद बांधकाम अभियंता यांना आता तरी अमळनेर च्या जनतेची कीव येणार का?प्रा जयश्री दाभाडे यांचे  मुन वॉक ऑन अर्थ...!अनोखे आंदोलन...!

चंद्रावर सापडले खड्ड्यात  पाणी.. !लवकरच जमीन विक्री..! खड्ड्यात लावले झाडे...
अमळनेर नगरपरिषद हद्दीतील रस्त्याची अत्यन्त वाईट अवस्था आहे.एकही रस्ता असा नाही की त्यावर खड्डा नाही.अश्या खड्डामय रस्त्यांवर सामान्य माणसाला चालणे देखील मुश्किल झाले आहे. एकही रस्ता असा नाही की त्यावर खड्डा नाही.सामान्य माणसाला मणक्यांच्या आजार, पाठदुखी,कंबर दुःखी इ आजारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रकारावर अमळनेर येथील लोक प्रतिनिधी,विरोधी पक्ष नेते आणि प्रशासन मूग गिळून बसले आहेत. आता लवकरच अमळनेर न प ची  निवडणूक देखील लागणार आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील राजकारण तुम्ही मी भाऊ भाऊ सर्व मिळून एकत्र खाऊ अश्या स्वरूपाचे दिसून येत आहे.
तसे पाहिले तर अमळनेर न प ने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने  ठेकेदारांना फारच डोक्यावर बसवून ठेवले आहे. अमळनेर शहरातील ठेकेदार हे चांगलेच गब्बर झाले आहेत.कामांची  गुणवत्ता पाहिली तर इंग्रज काळातील अभियंते सुद्धा लाजतील अशी परिस्थिती सध्या  अमळनेर येथील रस्त्यांची आहे. छत्रपती शिवरायांनी जर या अश्या अभियंतां कडुन  इ स  1600 च्या कालखंडात किल्ले बनवण्याचे काम दिले असते तर आज इतिहास इतिहासात जमा झाला  असता आणि शिवरायांनी अश्या नालायक /डिग्री हीन किंवा मतलबी डिग्री होल्डर यांना टकमक टोकावरून कडे लोट केले असतेच हे तितकच सत्य.

तसेच न. पा. अमळनेर व सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांच्या कडे सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी अनेक तक्रार केल्या आहेत.ज्यांना संडास बांधण्याची लायकी नाही ते ठेकेदारी क्षेत्रात उतरून चांगल्या जातिवंत /जातिवंत ठेकेदार यांनी बांधकाम विभागातून काढता पाय घेतला आहे. कारण टक्केवारी जास्त दिली कि गुणवत्ता कशी देता येईल..?त्यामुळे काही नेत्यांना हाताशी घेत लुंगे सुंगे डिग्री हीन अभियंते तयार झाल्याने अमळनेर ची पार दैना झाली आहे हे काही सामान्य जनतेपासून  लपून नाही.

अमळनेर मधील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यान मुळे, सा.बा अभियता , न. पा. अभियंता यांच्या कार्य प्रणालीवर प्रश्न उठत आहेत.नेत्यांचे स्पेशल नॉन डिग्री होल्डर ग्यांग ही अजगराचा विडखा न. पा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाना मारून बसलेत हे ही तितकेच कटू सत्य आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठेकेदारांना ठेका देताना अटी शर्ती नियमांखाली ठेका दिला जातो.रस्ता,त्याच्या लेयर आणि गुणवत्ता ह्यासाठी 3 ते 5 वर्ष विविध नियमांना अनुसरून मेंटेनन्स करणे म्हणजे त्या बांधकामाची देखरेख  करणे आवश्यक असते.पण इथे तर काम झालं की तू कोण आणि मी कोण अशी अवस्था आहे. या संदर्भात अमळनेर न प च्या मुख्याधिकारी यांनी सर्व खड्डे पडलेले रस्ते शॉर्ट लिस्टेड करून त्या त्या ठेकेदारांचे काँट्रॅक्ट तपासून त्यांना अटी शर्तींच्या अधीन राहून कामाला लावणे अपेक्षित आहे.
 त्या साठी आज प्रा जयश्री दाभाडे व समाजिक कार्यकर्ते अनंत निकम ह्यांनी खड्डे पडलेल्या रस्त्यांवर मुन वॉक आंदोलन व दिसला खड्डा की लाव झाड आंदोलन केले. यावेळी शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावत..मुन वॉक करण्यात आले की जेणे करून झोपलेले लोक प्रतिनिधी,प्रशासन यांना जाग येईल आणि न प चा अधिक खर्च न होता ज्या ठेकेदारांनी ही कामे केली आहेत त्यांना नोटिस बजावून त्यांच्या कडून रस्त्यांची डागडुजी करून घेणे आवश्यक आहे.यावेळी भुरा पारधी,पिंटू साळुंके,मनोज पवार,पुनमचंद पारधी,सिमा जैन,लता शाह,दक्षा शाह इ उपस्थित होते.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या