पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार
सामाजिक बांधिलकितुन आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्देशातुन प्रेरीत होऊन महत्वाकांक्षा, सन्मान, . आदर या त्रिसुत्री उपक्रमातुन स्थापन झालेल्या दत्तलिला बहुउद्देशिय संस्था पारोळा प्रेरित युगंधरा युथ फाऊडेशनने आज शिक्षक दिनाचे औवचित साधीत आदर्श शिक्षक गुरुजन स्वागत सत्कार समारंभ कार्यक्रमांचे अध्यक्ष आदरणीय आदर्श शिक्षक सदानंद धडु भावसार सर, प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, आदर्श शिक्षक रावसाहेब भोसले सर, कुशल संघटक महाराष्ट्र राज्य पदविधर शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गिरीषजी वाणी सर, एन ई एस हायस्कुलचे प्राचार्य पी.के सौंजे सर, गर्ल्स हायस्कुलच्या मुख्यध्यापिका सौ नंदिनी सुरेश मराठे, ला शा वाणी समाज मंडळ अध्यक्ष किरण वाणी, महिला मंडळ अध्यक्षा सौ अंजली शामकांत मुसळे तसेच या कार्यक्रमास उपस्थित सर्व शिक्षक वृंद मान्यवरांचे शाल पुष्प गुच्छ देऊन स्वागत सत्कार करुन युगंधरा युथ फाउंडेशन सदस्य नितीन पुरुषोत्तम शिनकर, अमोल गोविंद शिरोळे, भुषण प्रकाश टिपरे, कुशल सुभाष शिरोळे, सचिन चंद्रकांत नावरकर या सदस्यांनी सर्व समाज समावेशक स्तुत्य उपक्रम राबवित आज त्यांनी शवपेटी समाज कार्यात सुपुर्त केली असून या दातृत्व संपन्न सदस्यानी कोरोना काळात देखील चांगली मदत कार्य केल्याने त्यांचाही यावेळी दत्तलिला बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने अध्यक्ष विजय नावरकर, हेमकांत मुसळे, शरद मेखे सर, योगेश मैद सर, प्रसाद नावरकर सर, कैलास कोठावदे, सत्यजित शिरोळे, कुंदन अमृतकार, मंगेश शिरोळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष किरण वाणी यांनी बेटी बचाव बेटी पढाव या योजनेचा एक भाग म्हणुन गणेश चतुर्थी ते अनंत चतुदशी या काळात समाजात कन्यारत्न होणाऱ्या कुटुंबीयांस अकरा हजार देण्याचे जाहिर केले तसेच उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केली तर कार्यक्रमांचे सुत्रसंचलन शरद मेखे सर यांनी केले. तर उपस्थिताचे आभार विजय नावरकर यांनी मानलेत.

0 टिप्पण्या