कासोदा पोलीस स्टेशन मार्फत शिक्षक दिनानिमित्त परिसरातील मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मान

( प्रथमच असा उपक्रम राबविला म्हणून प्रशंसा )

 प्रतिनिधी / नुरुद्दींन मुल्लाजी

 येथील कासोदा पोलीस स्टेशनच्या वतीने डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त संबध भारतात शिक्षक दिन साजरा होत असतो . हे औचित्य साधुन कासोदा पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त व कर्तव्यदक्ष युवा पी एस आय मा निता कायटे यांनी कासोदा सह परिसरातील मुख्याध्यापक व शिक्षकांचा शिक्षकदिनी सत्कार केला . कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सुत्रसंचलन भारती विद्यामंदीर चे राजेंद्र ठाकरे यांनी केले . प्रथम राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन शिक्षक नेतृत्व टि डि एफचे अध्यक्ष तथा मुख्यध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर व साधना माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पी डी रंवदळे यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निता कायटे होत्या . सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने प्रमोद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की , प्रथम शिक्षकांचा पोलीस स्टेशन मार्फत सत्कार होत आहे . शिक्षक नेहमीच पोलीस स्टेशन पासून लांब असतो .परंतू निता मॅडम यांनी पोलीस स्टेशन मधे शिक्षकांचा सत्कार केला हाच आमचा सर्वात मोठा बहुमान समजतो . यावेळी पोलीस अधिकारी निता यांनी सांगितले की , कोणताही उच्चपदस्थ अधिकारी नेता असो व शास्त्रज्ञ हा शिक्षकांमुळेच घडत असतो . शिक्षक हाच मोठा शिलेदार समाजात पिढी घडविण्याचे कार्य करतो . यावेळी कासोदा आडगाव सह सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक बांधव उपस्थित होते . अग्लो उर्दूच्या शिक्षक असोशियन वतीने निता मॅडम यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी क . न मंत्री विद्यालयाचे मुख्याध्यापक बोरसे सर भारती विद्यामंदीरच्या मुख्याध्यापिका सौ वंदना चौधरी नांदखुर्दे जि प चे मुख्याध्यापक भगवान गढरी ;बांभोरीचे मुख्याध्यापक पांडुरंग चौधरी , नाना चौधर दिपक  बावस्कर सर , चौधरी सर , वाणी सर , पी डी रंवदळेसर मुख्तार  सर अजीज सर नासिर सर महेमिल सर अन्वर सर आसिफ सर इंमरनसर शोयएब सरआदि पस्तीस ते चाळीस शिक्षक बांधव उपस्थित होते शेवटी आभार ए पी आय  नरेश ठाकरे यांनी मानले .






Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या