दहादिवसीय पर्युषण महापर्वाची सौधर्म इंद्र व इंद्रायणी राहुल शहा व प्रिया शहा हस्ते महापूजनाने सांगता

 पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार

पारोळा - दिगंबर जैन बांधवांचे गेली दहा दिवसापासून पर्युषण महापर्व कुसुंबा अतिशय क्षेत्र दिनांक 10 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर पर्यंत मोठ्या उत्साहात मंगलमय वातावरणात संगीत बद्ध भक्ती भावाने संपन्न झाले .. या महा पर्वाची सांगता  सौधर्म इंद्र व इंद्रायणी राहुल शहा व प्रिया शहा हस्ते महापूजा अभिषेक समापन कार्यक्रमाने झाली. इंद्र म्हणून अशोक जैन शेंदुर्णी निधी शहा इंद्रायणी अभिनंदन शहा विजया शहा प्रफुल शहा (इंद्र) .

या दहा दिवसातील प्रथम दिवशी  सतीश  जैन इंद्र तर इंद्रायणी सौ सुलभा  जैन यांच्या हस्ते महापूजानाने दशलक्षण महापर्वाच्या पूजन विधि कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.

या दशलक्षण पर्वात प्रतिदिन विविध इंद्र इंद्रायणी द्वारा पूजन , अभिषेक चातुर्मास स्थित परम पूज्य तपस्वी सुदेह सागर जी महाराज यांच्या सानिध्यात संपन्न झाले. या पर्युषण पर्वाची सुरुवात उत्तम क्षमा धर्माने झाली. त्यावेळी उत्तम क्षमा दिनी सौ. सुलभा  जैन, उत्तम मार्दव दिनी , राजेंद्र  जैन, उत्तम आर्जव दिनी प्रदीप  जैन, उत्तम शौच दिनी पंकज  जैन, उत्तम सत्य दिनी संजय जैन, उत्तम संयम दिनी विजय जैन, उत्तम तप दिनी  किरण  जैन, उत्तम त्याग दिनी महावीर  जैन, उत्तम आकिंचन्य दिनी संजय  जैन, उत्तम ब्रह्मचर्य दिनी  राहुल  शहा च्या यांच्या तर्फे संगीतबद्ध महापूजा सुयोग जैन यांच्याद्वारे संपन्न झाले. या पर्युषण पर्वात दहा दिवस विश्वशांती सुख-समृद्धीसाठी शांतीनाथ महामंडळ विधान पूजा प्रतिदिन संपन्न होऊ लागली. अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धी प्रमुख व खान्देश जैन पत्रकार सतीश वसंतीलाल जैन कुसुंबा विश्वस्त महेंद्र हिरालाल जैन यांनी दिली. महापर्वा साठी सासरी गेलेल्या मुली माहेरी येऊ लागल्या त्यामुळे नगर भाविकांनी गजबजू लागली. सुंदर गाभारा, त्यातील आकर्षक मुलनायकांची वेदी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. इंद्र इंद्रायणी केसरी वस्त्र परिधानाने महामस्तकाभिषेका ची शोभा वाढविली. दानोळीकर सुयोग जैन नमोकार कलामंच संगीतकारांने भक्तिगीत आणि कुसुंबा गावाचा राजा  कुंथुनाथ भगवान आधी गीताने संगीतमय पूजनाने भाविकांचे मने जिंकली. संध्याकाळच्या पार्श्वनाथ सेवा मंचाने महाआरती सादर केलेल्या सुंदर नेटक्या सांस्कृतिक कार्यक्रमास सर्वांनी मनापासून दाद दिली कुसुंबा नगरी भक्ती रसात नाहून निघाली होती. भगवंतांच्या जयजयकाराने मंदिर दुमदुमले नेत्राचे पारणे फेडणार्‍या त्या आनंद सोहळ्याने मने हरवून गेली. टाळ्यांच्या (चंपाळी) वाद्यांच्या गजरात भक्तीचा महापूरच जणू आला. नेत्रातून अश्रू ओठातुन जय-जयकार आणि हृदयातून भक्ती पाझरू लागली. अत्यंत शांतपणे भक्तिपूर्वक कार्य झाले. पार्श्वनाथ सेवा व पद्मावती युवा मंचाने तन-मन-धनाने सर्वस्व अर्पण केले. हे महापर्वा चे वैशिष्ट होते. प्रचंड इच्छा शक्ती ने युवा मंच यांनी हाती घेतलेले हे कार्य सर्वांच्या पुण्योदया ने पूर्ण झाले असे धार्मिक महोत्सव समाजातील दुफळी दूर करून एकी चैतन्य निर्माण करून अहिंसामय धर्माचा प्रचार प्रसार करतात. त्यामुळे ते मोलाचे ठरतात. "न भूतो न भविष्यती" असा दशलक्षण सोहळा झाला. तो सर्वांना याची देही याची डोळा पाहायला मिळाला .


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या