डॉ. पाकिजा पटेल यांचा शिक्षण समिती जि.प. जळगाव तर्फे सत्कार.

  प्रतिनिधी नूरुद्दिन मुल्लाजी

 पारोळा तालुक्यातील राजवड आदर्शगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका पाकीजा उस्मान पटेल यांचा जळगाव जिल्हा परिषद शिक्षण समिती तर्फे माननीय सभापती रवींद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ  राज्य कार्यकारणी मध्ये डॉ. पाकीजा उस्मान पटेल यांची निवड झाल्यामुळे सत्कार करण्यात आला. या सभेला शिक्षण सभापती रवींद्र पाटील, जि .प .सदस्य पोपट तात्या भोडे, प्राथमिकशिक्षण अधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण., सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पी. जी. पाटील, राज्य पुरस्कार प्राप्त ज्ञानेश्वर सोनवणे , संजय पाटील उपस्थित होते.


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या