पहुर येथे 3 दिवसीय लॉकडॉन कृषी केंद्र संचालकांनी सहभाग नोंदवत १०० टकके बंद

पहुर येथे 3 दिवसीय लॉकडॉन कृषी केंद्र संचालकांनी सहभाग नोंदवत १०० टकके बंद 

जामनेर ता प्रतिनिधी चव्हाण
पहूर , ता . जामनेर दि . १० ( वा वार्ताहर  ) कृषी आयुक्तांच्या निषेधार्थ पुकारलेल्या ३ दिवसीय बंदमध्ये आज   पहूर येथील कृषी केंद्र संचालकांनी सहभाग नोंदवत १०० टकके बंद यशस्वी केला .  कृषी आयुक्तांच्या निषेधार्थ कृषी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय कृषी केंद्र संचालकांनी घेतलेला होता .
        सोयाबीन न उगविल्याप्रकरणी बियाणे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कृषी आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध  दि . १० ते १२ जुलै दरम्यान कृषी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविणार असून महाराष्ट्र फर्टिलायझर ,पेस्टीसाईड ,सीडस डीलर्स अशोसिएशन च्या निर्णया नुसार पहूर येथील  सर्व कृषी केंद्र बंद राहणार असल्याचे पहूर कृषी केंद्र संघटनेच्या वतीने माजी सभापती प्रदिप लोढा यांनी सांगितले आहे.
दरम्यान दोन दिवस पाऊस झाल्याने  शेतशिवारात    कामांना गती मिळाली आहे .खते देण्याच्या ऐन वेळी कृषी केंद्र बंद असल्याने सामान्य शेतकऱ्यांची कोंडी होत आहे . पैसे असूनही खते न मिळाल्याने शेतकरी हैराण होत आहेत .
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या