नगरदेवळ्यात अखेर कोरोनाचा शिरकावएक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला



नगरदेवळ्यात अखेर कोरोनाचा शिरकावएक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला

ता प्रतिनिधी सैय्यद दानिश
नगरदेवळा ता. पाचोरा गावात कोरोना येऊ नये यासाठी स्थानिक ग्रामपंचायत,आरोग्य व पोलीस प्रशासनाकडुन विशेष  खबरदारी घेण्यात आली असतानाही अखेर नगरदेवळा  गावात एका  65 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गाव व परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
  गेल्या चार महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असल्याने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडुन वारंवार लॉकडाऊन तसेच संपूर्ण गावात सॅनिटायझर, हायड्रोक्लोराईड फवारणी एक ना अनेक प्रकारे कोरोना प्रतीबंधासाठी विविध उपाययोजना  राबविण्यात आल्या होत्या. त्यामुळेच व्यापारपेठेच गाव, परिसरातील मोठी बाजारपेठ व त्यामुळे होत असलेली गर्दी असतानाही आतापर्यंत कोरोना रोखण्यात प्रशासनास यश आले होते. परंतु गेल्या तीन चार दिवसांपूर्वी येथील एका पुरुषाची तब्येत बरी नसल्याने औरंगाबाद येथील मुलाकडे  खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . परंतु तब्येतीत सुधारणा न झाल्याने  तेथे 7 जुलै रोजी झालेल्या कोरोना चाचणीत अहवाल पॉझेटिव्ह आला आहे.तर त्यांच्या पत्नी चाही  स्व्याब अहवाल घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे .
पाचोरा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच पाठोपाठ जास्त लोकसंख्या असलेल्या नगरदेवळा गावातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. यावर उपाययोजना म्हणून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चार जणांना पाचोरा येथील कोविड कक्षात कोरोंटाईन करणार आहे व परिसरातील 17 जणांना होम कोरोन्टाईन केले तसेच संपूर्ण परिसर सील करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संतोष शिवणेकर यांनी दिली. त्यावेळी मंडळ अधिकारी संजय साळुंखे, वैद्यकीय अधिकारी विरेंद्र पाटील,  सरपंच सिंधूताई महाजन, उपसरपंच सागर पाटील, प्रकाश परदेशी, सौ.दराडे मॅडम, रुपाली पाटील आदी उपस्थित होते.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या