कोरोना योध्या कोरोनाला हरवून सुखरूप घरी परतला कॉलनी वासीयांसह कुटुं बीयानी केले स्वागत
जामनेर (प्रतिनीधी):-विठ्ठल चव्हाण
जामनेर येथील गिरिजा कॉलनीतील राहिवाशी आणि वरणगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अतुल कुमावत याना आपली सेवा बजावताना आपले कर्तव्य पार पाडत असताना व नागरिकांच्या रक्षणासाठी आपली मुलं बाळ कुटुंब सोडून सेवा देत असताना. दि २१तारखेला कोरोना बाधित असल्याचा अहवाल समजताच आपल्या परिवाराला धीर देत भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये स्वतः दाखल झाला होता. हॉस्पिटलमध्ये अतीशय उत्तम प्रकारे उपचार झाल्याने अतुल कोरोनाला हरवून बरा झाला .हॉस्पिटल मधून वरणगाव पोलीस ठाण्यात कोरोना योध्दा अतुलचे सहकाऱ्यांनी स्वागत केले. आज दुपारी २-३० वाजल्याच्या सुमारास कोरोना योध्दा अतुल यानी गिरिजा कॉलनीत प्रवेश केल्या नंतर प्रथम कॉलनीवासीयांचे वआराध्यदैवत संतोषी मातेचे आशीर्वाद घेतले. नंतर घरी कुटुंबीयांनी अतुलचे जोरदार स्वागत केले यावेळी कोरोना योध्दा अतुल कुमावत यांच्या मित्रपरिवराने स्वागत केले यात भास्कर महाजन, प्रल्हाद सोनवणे, अमोल पाटील, अंकित महाजन,पंकज चंदनशिव, स्वराज महाजन, संजय पाटील,शुभम कुमावत,महेश पाटील यांच्या सह कुमावत कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.

0 टिप्पण्या