पेट्रोल डिझेल च्या दरवाढी त्याविरोधात एरंडोल ला काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन

पेट्रोल डिझेल च्या दरवाढी त्याविरोधात एरंडोल ला काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन


एरंडोल
प्रतिनिधी नूरुद्दीन मुल्लाजी
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ एरंडोल येथील तहसील  कार्यालयासमोर एरंडोल तालुकाध्यक्ष विजय अण्णा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले
व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की सध्या जगात कोरोना महामारी चे थैमान घातले असून सर्वसामान्य जनता रोजगारास मुकले आहेत बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करीत आहे अशा कठीण प्रसंगी 7 जुन 2020 पासून इंधनाच्या दरात दरवाढ केली जात असून जनतेला त्याचा भार सोसावा लागत आहे तरी इंधनाचे भाव कमी करावे अशी मागणी करण्यात आली आहे
या निवेदनावर एरंडोल तालुका अध्यक्ष विजय अण्णा महाजन शहराध्यक्ष संजय भदाणे रईस अहमद शेख प्राध्यापक आर एस पाटील इमरान सय्यद शेख सांडू मदनलाल भावसार संजय कलाल आदींच्या सह्या आहेत
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या