खतांची टंचाईमुळे शेतकरी चिंतातुर खते पुरवठा होण्याची मागणी

खतांची टंचाईमुळे शेतकरी चिंतातुर खते पुरवठा होण्याची मागणी


प्रतिनिधी नूरुद्दीन / मुल्लाजी
कासोदा : येथील व परिसरातील पेरण्या आटोपून १ महिन्याच्या जवळपास झाला आहे पिकांची वाढ होण्यासाठी युरियाची गरज भासत असते परंतु ऐन पिकांच्या वाढीच्या काळात युरिया सह इतर खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी सहकारी संस्था व खाजगी कृषी सेवा केंद्राकडे हेलपटा मारत आहे परंतु युरीया सह डि ए पी १२ .३२ .१६ , १० .२६ .२६ , २० .२० .० , १५ .१५ .१५ पोटॅश आदि रासायनिक खताची मागणी होत आहे कापूस मका ज्वारी इतर पिकांच्या वाढीसाठी अत्यंत गरज भासत आहे परिसरातील सर्वात जास्त खत पुरवठा व सर्व प्रकारचे खते उपलब्ध करून देणारी कै आबासाहेब खंडेराव पाटील सहकारी फ्रुटसेल संस्थेत देखील खते उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमधे नाराजीचे सुर व्यक्त होत आहे  परिसरात सर्व शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत असल्याने खतांचा पुरवठा लवकर व्हावा अशी मागणी होत आहे आमच्या प्रतिनिधी ने फ्रुटसेल सहकारी संस्थेचे चेअरमन शालीग्राम पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पाटील यांनी सांगितले की आम्ही खते पुरवठा करणाऱ्या कंपनी अधिकारी वर्गाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की लवकरात लवकर खतांचे रॅक येऊन खतांचा पुरवठा करण्यात येईल तरी शेतकऱ्यांनी खतांचा पुरवठा लवकर करण्याची मागणी होत आहे अन्यथा मुदतीनंतर खतांचा काही उपयोग होणार नाही
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या