भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या जळगाव तालुका उपाध्यक्षपदी स्वप्निल सोनवणे यांची निवड !

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या जळगाव तालुका उपाध्यक्षपदी स्वप्निल सोनवणे यांची निवड !

जळगाव प्रतिनिधि
जळगाव - देशातील तरुणाईला दिशादर्शक असणारी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध उपक्रम राबवणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थातच भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या जळगाव तालुका उपाध्यक्षपदी तालुक्यातील नंदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल रजनी शांताराम सोनवणे यांची निवड करण्यात आली.
७ जुलै रोजी त्यांना निवडपत्र प्राप्त झाले. या सेवाभावी युवकाचे सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील कार्य लक्षात घेता जळगाव जिल्हाध्यक्ष तेजस पाटील यांच्या शिफारशीने युवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्तचना मूर्ती रामू व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. त्रेविनिकुमार कोरे डॉ.त्रेवीणीकुमार कोरे यांनी ही निवड केली आहे.
युवा परिषदेच्या माध्यमातून युवकांचा सामाजिक कार्यात सहभाग वाढवून विधायक कार्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सोनवणे यांनी सांगितले.स्वप्निल सोनवणे हे विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून विविध क्षेत्रात कार्य करणारे सेवाभावी युवक म्हणून त्यांची समाजात ओळख राहिली आहे.स्वप्निल हे नंदगावचे माजी सरपंच शांताराम सोनवणे यांचे चिरंजीव असून या निवडीबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या