मानसेवी शिक्षकांचे रखडलेले मानधन त्वरित अदा करा- शेख अब्दुल रहीम
मुप्टा शिक्षक संघटनेची मांगणी
औरंगाबाद
प्रतिनिधी नूरुद्दीन मुल्लाजी
-अल्पसंख्याक शाळांमध्ये 8 वि ते 10वि वर्गाला मराठी शिकविण्यासाठी मानसेवी शिक्षक अल्पसंख्याक विभागातर्फे दरवर्षी मानधन तत्वावर नियुक्ती असते. मानसेवी शिक्षकांचे शैक्षणिक वर्ष मार्च महिन्यात संपले होते परंतु आद्यप ही त्यानां मागील 3 महिन्याचे मानधन मिळाले नाही.मानसेवी शिक्षकांच्या विनंती नुसार मुप्टा शिक्षक संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष तथा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी 30 एप्रिल रोजी एका निवेदनाद्वारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री ना.नवाब मलिक साहेब, अल्पसंख्यांक विभागाचे मुख्य अप्पर सचिव मा.जयश्री मुखर्जी मॅम,, तसेच अल्पसंख्यांक संचालक साहेब यांच्या कळे मांगणी केली होती परंतु अद्याप ही मानसेवी शिक्षकांचे मानधन रखडले आहे. पुन्हा मानसेवी शिक्षकांचे फोन आणि विनंती नुसार आज पुन्हा *स्मरणपत्र* देऊन पुन्हा सर्वाना मांगणी करण्यात आली आहे. कोरोना चा प्रार्दुभाव मुळे अनेक जण आर्थिक संकटात सापळले आहे मानसेवी शिक्षकांना ही आर्थिक संकट असल्याने त्वरित त्यांचा 3 महिन्याचा रखडलेला मानधन त्वरित अदा करण्यात यावा *अशी मांगणी मुप्टा शिक्षक संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष तथा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी केली आहे...

0 टिप्पण्या