पिंपळगांव कमानी येथील सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारू बंद करा

पिंपळगांव कमानी येथील सुरु असलेल्या गावठी हातभट्ट्या बंद करा.-जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेतर्फे तालुका पोलिस स्टेशन आणि पहूर पोलिस स्टेशन येथे याविरोधी जनआंदोलन छेडू-अशोकराव चव्हाण


पहूर प्रतिनिधी-विठ्ठल चव्हाण:- विठ्ठल चव्हाण 
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून लॉकडाऊन  च्या कालावधीमधे पिंपळगांव कमानी हद्दीमधे गावठी  दारूचा महापूर वाहतोय आणि यामूळे गावातील अनेक युवा तरुण व पुरुष मंडळी व्यसनाधीन झाले आहेत.आणि कित्येक जण या व्यसनापायी मृत्यू देखील पडले आहेत.याविषयी स्थानिक पहूर पोलिस स्टेशन याआधीही खूप वेळा तत्कालीन सरपंच-कै.भागाबाई चव्हाण आणि विद्यमान सरपंच-सौ.कविताताई राठोड आणि विद्यमान पोलिस पाटील-इंदलभाऊ चव्हाण यांनी ग्रामसभा ठराव आणि तक्रारीचे निवेदन दिले आहे.परंतु स्थानिक पोलिस स्टेशन फक्त तात्पुरती कारवाई करतात असे निदर्शनास आले आहे.परंतु या गावातील स्थानिक तरुण आता खूपच व्सनाधीन होत चालला असून काहींचे कुटूंब उद्धस्त होत आहेत.*
       *पिंपळगाव कमानी या गावाच्या चारही बाजूने दारूच्या हातभट्ट्या सुरु असून ठीक ठिकाणी मोठे वाघूर नदी काठावर,धरण,पाटचारी,जांभूळ रोड,मोती आई मंदिर व धरणाच्या सभोवताली खूप मोठ्या प्रमाणात गावठी दारूची विक्री होत आहे.यामुळे गावाच्या चारही बाजूला दारूविक्री होत असल्यामुळे महिला शेतामध्ये वेळेअभावी एकट्या जातात व दारुडे रस्त्यामधे संध्याकाळ पर्यंत बसलेले असतात यामुळे एखादी विपरीत घटना घडल्यास याला जबाबदार कोण? हा प्रश्न पडला आहे.*
       *याविषयी पहूर पोलिस स्टेशनचे एपीआय-राकेशसिंह परदेशीसाहेब यांनी त्वरीत लक्ष घालून येत्या २-३ दिवसामधे ही गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर दबंग कारवाई करणार काय?पोलीस स्टेशन प्रशासन, जान कर भी अंजान असं का? असा प्रश्न आता स्थानिक गावकरी यांच्या मनात पडलाय,जर येत्या २-३ दिवसात या दारू भट्ट्या बंद नाही झाल्या आणि दारूविक्री बंद नाही झाली तर,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि गावातील सर्व महिला बचत गटातर्फे पहूर पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येणार असा इशारा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,सचिव-विठ्ठलभाऊ चव्हाण,संचालक-तुकाराम चव्हाण,गणेश राठोड,विकास चव्हाण,योगेश राठोड,अजय पवार,प्रविण चव्हाण,सौ.अनुसया चव्हाण,तसेच जय भवानी स्वयंसहाय्यता महिला बचतगट अध्यक्षा-सौ.वंदना चव्हाण यांच्यासह गावातील सर्व महिला भगिनी यांनी दिला आहे.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या