सुमारे ४ महीन्यांपासुन कोर्टातील संपुर्ण कामकाज ठप्प पडले असल्यामुळे संपुर्ण वकील वर्गावर फार मोठे आर्थीक संकट

सुमारे ४ महीन्यांपासुन कोर्टातील संपुर्ण कामकाज ठप्प पडले असल्यामुळे संपुर्ण वकील वर्गावर फार मोठे आर्थीक संकट

अमळनेर प्रतिनिधी सत्तार खान 
अमळनेर वकील संघातर्फे दि.१४/०७/२०२० रोजी अमळनेर कोर्टाच्या आवारात आर्थिक संकटात सापडलेल्या वकील वर्गाकरीता शासन दरबारी मागणी करण्या संदर्भात मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.     "सुमारे ४ महीन्यांपासुन कोर्टातील संपुर्ण कामकाज ठप्प पडले असल्यामुळे संपुर्ण वकील वर्गावर फार मोठे आर्थीक संकट कोसळलेले आहे."* *ज्या प्रमाणे इतर राज्यांमधील बार कौन्सील प्रतिनीधींनी आपापल्या राज्यातील वकीलांचे हिताचा विचार करून  आर्थीक अडचणीत सापडलेल्या* *वकीलांसाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन प्रत्येकी दरमहा ५०००/-रूपयांची कोरोना* *काळाकरीता आर्थीक* *मदत केली आहे.त्यात कर्नाटक राज्यसरकार, तामीळनाडु राज्य सरकार,*
*आंध्रप्रदेश राज्य सरकार तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी*
*वकीलांकरीता पँकेजेस दिले आहेत तसेच पँकेजेस आपले महाराष्ट्र राज्य सरकारने देखील महाराष्ट्रातील सर्व वकीलां करीता दिले पाहीजे अशी मागणी अमळनेर वकील संघा तर्फे आयोजित*  *केलेल्या मिटींगमध्ये करण्यात आली. तसेच बारकौन्सील आँफ महा.व गोवाचे प्रतिनीधी यांनी वकीलांच्या हिताचा विचार करून सरकार दप्तरी वरील मागणी लावुन धरायला हवी अशी अपेक्षा* *वकीलांनी व्यक्त केली. सदरील मागणीचे निवेदन देखील सचिव,बारकौन्सील आँफ महा* *व गेावा यांना व* *अमळनेर तालुक्यातील आदरनिय आमदार दादासाो.अनिल भाईदास पाटील यांना अमळनेर वकील संघा तर्फे देण्यात आले आहे.* *वकीलसंघाच्या मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार श्री.अनिलदादा पाटील यांनी उपस्थीत सर्व वकीलांना दिले* *आहे.त्या वेळी वकील संघाचे सचिव अँड. दिनेश पाटील,उपाध्यक्ष अँड.संभाजी पाटील व अध्यक्ष अँड. शकील काझी व सिनी.अँड.श्री.अशोक बाविस्कर सह मोठ्या संखेने वकील उपस्थीत होते. पदाधिका-यांसह*  
*अँड.अशोक बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले व पुढील आंदोलनाची दिशा दर्शविली.*
*वकील संघाचे सचिव अँड.दिनेश पाटील यांनी उपस्थीतांचे आभार मानले.*
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या