रेशनिंग कार्ड असूनही धान्य दुकानातून नागरिकांना राशन मिळत नाही तहसीलदारांना निवेदन

रेशनिंग कार्ड असूनही धान्य दुकानातून नागरिकांना राशन मिळत नाही तहसीलदारांना निवेदन

जामनेर (प्रतिनिधी ) विठ्ठल चव्हाण 
जामनेर शहरातील महिला व काही नागरीकांची तक्रार शिवसेना शहर प्रमुख पवन माळी यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी लगेचकाही वेळ न लावता महिला व नागरिकांच्या समस्या घेऊन तहसीलदाराकडे गेले असता महिला व नागरिक यांनी शिवसेना शहर प्रमुख  पवन माळी सोबत तहसीलदार यांना  निवेदने दिली व तहसीलदार साहेबांशी चर्चा केली की या महिलांना राशन कार्ड असूनही राशन दुकानदार त्यांना धान्य देत नाही त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी सांगितले योग्य ती कारवाई करण्यात येईल व यांना सर्वांना धान्य देण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी उपस्थित जामनेर शहर शिवसेना प्रमुख पवन माळी उपशहर प्रमुख काशिनाथ शिंदे शाखाप्रमुख सुनील गायकवाड, विनोद चव्हाण, मुकेश जाधव ,दिपक माळी ,तुकाराम काळे आदी शिवसेना कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या