TET (टी. ई. टी) परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करावा- शेख अब्दुल रहीममु प्टा शिक्षक संघटनेची मांगणी....।.

TET (टी. ई. टी) परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करावा- शेख अब्दुल रहीममु प्टा शिक्षक संघटनेची मांगणी....।.


औरंगाबाद
प्रतिनिधी /  नूरुद्दीन मुल्लाजी
 मुप्टा शिक्षक संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष तथा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चे मा.आयुक्त/ अध्यक्ष  साहेब यांच्याकळे निवेदन सादर करून मांगणी केली आहे की महाराष्ट्र राज्यातील हजारो भावी शिक्षकांनी 19 जानेवारी ला TET ची परीक्षा दिली होती तसेच 24 फेब्रुवारी ला अँसर की (Answer key) ही देण्यात आली होती परंतु आज जवळपास 5  महिने झाले आहे  परीक्षा घेऊन तरी ही अद्याप निकाल लागला नाही आहे.हजारो भावी शिक्षकांचे फोन येत होते की सर आपण काही याबाबत काही करा. हजारो भावी शिक्षकांच्या विनंती वरून  म्हणून आज निवेदनाद्वारे ही मांगणी करण्यात आली आहे की लवकरात लवकर TET परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात यावा  तसेच लवकरात लवकर निकालाची तारीख जाहीर करण्यात यावी ही विनंती करण्यात आली आहे.इमेल आणि व्हाट्सअप्प द्वारे निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे निवेदनावर मुप्टा शिक्षक संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष तथा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर, शफीक पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहे...
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या