अंमळनेर प्रतिनिधि सत्तार खान
अमळनेर दिनांक २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांच्या व पोस्टमन यांचा सत्कार पोस्ट ऑफिस इथे सकाळी ध्वजवंदन नंतर आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक व रोटेरियन श्री सुहास राणे उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे आपल्या संभाषणात म्हणाले की संपूर्ण भारत वर्षात पोस्टल विभाग अतिशय आपुलकीने व प्रामाणिकपणे सेवा देत असतात व या शासकीय कार्यालयात अजून पर्यंत भ्रष्टाचार बोकाळलेला नाही त्याच्या आनंद आहे .लहान असो किंवा मोठी व्यक्ती असो सर्वांना पोस्टमन एक समान सेवा देतात व अतिशय आपुलकीने जिव्हाळ्याने काम करत असल्याने ते नागरिकांचे कुटुंबाचे सदस्य बनलेलेआहे. नोटाबंदी व कोविड १९ मध्ये पोस्ट कर्मचाऱ्यांनी केलेले कार्याचे निश्चितच कौतुक करावे लागेल .याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अंमळनेर यांनी केलेला सत्कार हा त्यांच्या कार्याची पावती आहे असे मला वाटते व ग्राहक हिताचे सर्वोत्तम कार्य त्यांनी केलेले आहे. एडवोकेट भारती अग्रवाल म्हणाल्या की भारत सरकारने जाहिरात क्षेत्रात ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून सर्वप्रथम एका पोस्टमनची निवड केलेली आहे हे पोस्ट विभागा करिता अतिशय गौरवास्पद बाब ठरली आहे. उर्दूचे प्रख्यात शायर निदा फाजली यांच्या एक शेर एडवोकेट अग्रवाल यांनी हा शेर सादर केला "सीधा-साधा डाकिया जादू करे महान ! एक ही थैले में रखे आंसू और मुस्कान !" पोस्ट विभागा तर्फे श्री जी.टी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सुरुवात संघटन मंत्रने करण्यात आली सचिव सौ कपिल मुठे यांनी संघटन मंत्र म्हटले तर प्रस्ताविक विजय शुक्ल यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय माजी अध्यक्ष मकसुद बोहरी यांनी केले. याप्रसंगी सब पोस्टमास्टर श्री डी.एम.चौधरी साहेब व असिस्टंट पोस्टमास्टर श्री जे.एन. शेख साहेब यांच्या व उपस्थित सर्व पोस्टमन बंधू-भगिनी सर्वश्री श्री एस.एम. पाटील , श्री एस.एल.शिंपी , श्री एच.व्ही. बडगुजर, श्री एन.टी.पाटील, श्री डी. एल.चौधरी श्री जी.एम.पवार, श्रीमती के.वाय.पाटील, श्री के.एच.माळी, श्री जे.डी.जाधव स्टॅम्प वेंडर श्री डी.आर. दुसाने आदींच्या शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पोस्ट विभागातर्फे श्री जी .टी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगीअ.भा. ग्राहक पंचायत पदाधिकारी म्हणून ऊर्जा मित्र सुनील वाघ, सचिव सौ कपिला मुठे, सौ करुणा सोनार, सौ मेहराज हुसेन, सौ अंजू ढवळे ,सौ ज्योती भावसार ,सौ आरती रेजा, कदीर सादिक, मधुकर सोनार, ताहा बुकवाला ,दीपक तिवारी ,डॉक्टर रमेश वानखेडे .आणि इतर सर्व पोस्ट कर्मचारीसह इतर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विसर्जन मंत्र कपिला मुठे यांनी म्हटले. शेवटी आभार प्रदर्शन संघटक सौ करुणा सोनार यांनी केले.

0 टिप्पण्या