मंगरूळ येथे बेटी बचावो बेटी पढाओ कार्यक्रम उत्साहात साजरा.

 


राहुल भदाणे प्रजान्युज अंमळनेर प्रतिनिधी

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या अंतर्गत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील सर्व अंगणवाडी  सेविका ताई तसेच मदतनीस ताई यांच्या सहकार्याने बेटी बचावो बेटी पढावो कार्यक्रम व प्रथम मुलीच्या जन्माचे स्वागत कार्यक्रम करण्यात आला. तरी त्यावेळी सर्व किशोरवयीन मुली व सर्व महिला भगिनी देखील यावेळी उपस्थित होत्या.तरी त्या अनुषंगाने या जगात मुलींचे महत्त्व किती आहे याचे महत्त्व पटवून देण्यात आले. वरील सर्व कार्यक्रम बाल विकास प्रकल्प अधिकारी बी.बी.वारुडकर साहेब तसेच शिरुड बीटाचे सुपरवायझर थोरात मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार करण्यात आला.

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या