प्रतिनिधि निलेश शितोळे
आज दि.२८/०१/२०२१ रोजी श्री.सद्गुरू गोविंद महाराज प्रकट दिना निमित्त सदगुरू गोविंद महाराजांच्या कासोदा या पावन नगरीत सद्गुरू गोविंद महाराज यांच्या सद्गुरूंची आरती,पूजापाठ आदींसह विविध धार्मिक विधी संपन्न झाले.दरम्यान,पहाटे श्री.सदगुरू गोविंद महाराज यांच्या मूर्तीची गुलाबपुष्पांच्या हारांनी आकर्षक सजावट करण्यात आली.पादुका पूजन व अभिषेक करण्यात आला.नंतर पाच जोडप्यांनी संध्याकाळी 7 वाजता सद्गुरूंची महाआरती झाली अन भाविकांनी श्री.सदगुरू गोविंद महाराज यांचा जयघोष केला.भाविक भक्तांनी सहभाग घेऊन,दर्शन घेतले.त्या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित हरीनाम सप्ताह पंच मंडळ,गावातील पदाधिकारी,वरिष्ठ मंडळी,गावातील पुरुष,महिला मंडळ,व अनेक तरुण - तरुणी उपस्थित होते.



0 टिप्पण्या