मुबई, 27 जानेवारीठा ण्याच्या दीपीत पाटीलने जोरदार कामगिरी उपनगर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित डॉ. रमेश प्रभू स्मृती 82 व्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या युथ आणि ज्युनियर एकेरी गटाचे जेतेपद मिळवले. या स्पर्धेचे आयोजन विले पार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे.दीपीत पाटीलने मुलांच्या युथ गटातील अंतिम लढतीत तन्मय राणेला 11-5,12-10,11-13, 14-12,12-14, 11-6 असे पराभूत केले. त्यापूर्वी मंगळवारी मुलांच्या ज्युनियर गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या दीपीत पाटीलने आदिल आनंदवर चुरशीच्या लढतीत 11-13, 11-4, 11-7, 12-10, 9-11,11-3 असा पराभव करत जेतेपदावर अपाळे नाव कोरले. सामन्यातील पहिला गेम दीपीतला 13-11 असा गमवावा लागला. पण, त्याने सलग तीन गेम जिंकत सामन्यात आघाडी घेतली. आपली ही आघाडी त्याने अखेरपर्यंत कायम ठेवत विजय मिळवला.
मुलांच्या युथ गटातील उपांत्यफेरीच्या लढतीत तन्मय राणेने चिन्मय सोमय्याला 9-11,11-8,11-7,5-11,4-11,11-8,11-9 अशा फरकाने पराभूत केले.तर, दुसऱ्या उपांत्यलढतीत रिगन दीपीत पाटीलने रिगन अल्बूक्युरेक्यु 11-9, 9-11,12-10, 6-11, 11-8, 12-14, 12-10 असे पराभूत केले.त्यापूर्वी ज्युनियर गटातील उपांत्यलढतीत दीपीत पाटीलने जश मोदीला 11-4,11-6,11-3,6-11,7-11, 9-11,11-9 असे नमविले. तर, आदिल आनंदने ऋषिकेश मल्होत्राला
5-11,11-8,11-7, 11-8,7-11,11-8 असे नमविले.
ज्युनियर एकेरी निकाल :
उपांत्यपूर्व फेरी :
दीपीत पाटील वि. वि. नील मुळे 11-7, 11-9, 11-9, 11-4,


0 टिप्पण्या