अमळनेर प्रतिनिधी सत्तार खान
समृद्ध गाव स्पर्धा 2020-21 अंतर्गत पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सिने दिग्दर्शक सत्यजित भटकळ साहेबांचे आगमन प्रसंगी सरपंच सुषमा पाटील यांनी स्वनिर्मित पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच जलमित्र महिलांनी औक्षण केले नंतर प्रथम गावातील जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरणाचे काम पाहिले
तसेच बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षलागवड मियावाकी वृक्ष लागवड, नाला खोलीकरण तसेच श्रमदानातून निर्मिती केलेली पाझर तलावांची मागील वर्षी झालेले कामाची पाहणी केली गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन झालेल्या कामांबद्दलचा फायदा जाणून घेतला व तसेच व सत्यजित सरांनी बिहार पॅटर्न अंतर्गत महिला बचतगट यांनी लावलेल्या झाडांच्या ठिकाणी वटवृक्षांचे रोप लावले व त्यांना गावात झालेल्या कामांबद्दल आनंद व्यक्त करून भविष्यात ही अशाच प्रकारे जलव्यवस्थापन करणे बाबत मार्गदर्शन केले आनोरे गावातील जलमित्रांनी दहिवद येथे येऊन सन्मान चिन्ह देऊन लोकनियुक्त सरपंच सौ सुषमा पाटील व जलमित्रांचा सत्कार केला तसेच गटविकास अधिकारी वायळ साहेबांनी बचतगटाच्या महिलांनी केलेल्या कामाचं कौतुक केले
पाणी फाउंडेशन जिल्हा समन्वयक सुखदेव भोसले तालुका समन्वयक सुनील पाटील व भूषण ठाकरे
लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसले अमळनेर तालुक्याचे गट विकास अधिकारी संदीप वायाळ साहेब,ए.टी.पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी व दहिवद गावातील जेष्ठ नागरिक ग्रामस्थ, बचतगट च्या अध्यक्ष जयश्रीताई उज्वला माळी विद्या पाटील बचतगट च्या इतर महिला जलमित्र तसेच पातोंडा जवखेडा व अनोरे गावाचे जलमित्र इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते...

0 टिप्पण्या