कासोदा सेंट्रल बँकेत पैशांचा तुटवडा - ग्राहकांना मनस्ताप"

प्रतिनिधी | नुरुद्दीन मुल्लाजी

 कासोदा येथील सेंट्रल बँकेत गेल्या तीन दिवसापासून पैशांचा तुटवडा असल्यामुळे ,ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शाखेकडून पुरेसे पैसे मिळत नाही. ज्यांना एक लाख रुपये पाहिजेत ,त्यांना 20 हजारापर्यंत रक्कम दिली जात आहे .ग्रामीण भागात सध्या लग्नसराई सुरू असल्यामुळे ,ग्राहकांना पैशाची आवश्यकता असूनही  वेळेवर पुरेसे पैसे मिळत नाही .---याबाबत शाखा व्यवस्थापक यांना विचारणा केली असता ,त्यांनी सांगितले की ,जळगाव शाखेतील बहुतांशी कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण झाल्यामुळे ,पैसे पाठवणारे कर्मचारी उपलब्ध न झाल्यामुळे ,पैशांचा पुरवठा होऊ शकत नाही .त्यामुळे अडचण येत आहे तरी, पण सोमवारपर्यंत व्यवहार सुरळीत होतील ,असे त्यांनी सांगितले.

     "कासोदा शाखेत कर्मचारी संख्या कमी"--- कासोदा येथील सेंट्रल बँकेला कासोद यासह  अनेक गावे जोडलेले आहेत .परिसरातील ही एकमेव राष्ट्रीय बँक आहे. त्यामुळे या बँकेत सभासद संख्या ही मोठी आहे .या बँकेला कमीत कमी नियमित चार कर्मचारी अपेक्षित आहेत .,मात्र प्रत्यक्षात फक्त दोन कर्मचारी काम करत आहे. कासोदा परिसरातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांचे पगार ,सेवानिवृत्ती धारकांचे पगार ,निराधार योजनेचे पगार ,शेती कर्ज ,विद्यार्थी शिष्यवृत्ती ,बचत गट आणि मोठी बाजारपेठ असलेल्या कासोदा च्या व्यापाऱ्यांचे व्यवहार या बँकेत असल्यामुळे ,नेहमी खूप गर्दी असते. दहा मिनिटाच्या कामासाठी दोन दोन तास वेळ द्यावा लागतो. तरीही चांगल्या पद्धतीने सेवा मिळत नाही. याबाबत वरिष्ठांनी लक्ष देऊन ग्राहकांच्या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात येत आहे.


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या