प्रतिनिधी | निलेश शितोळे
दि.०७/०२/२०२१ रोजी पद्मालय ट्रस्ट चे चेअरमन व एरंडोल चे माजी सभापती मा.श्री.अण्णासाहेब आनंदराव नामदेवराव पाटील.यांचा आज सहस्रचंद्र दर्शन सोहळ्या चा वाढदिवस कार्यक्रम पद्मालया येथे पार पाडला.त्यांनी आपल्या सह-पत्नी मंगलाबाई पाटील यांसोबत पूजापाठ करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली. सहस्रचंद्रदर्शन सोहळा म्हणजे काय ते सांगितल, आपल्या संस्कृतीमध्ये एक छान संकल्पना आहे. वयाची 81 वर्षे पूर्ण होत असताना त्या व्यक्तीने 1000 पौर्णिमा पाहिलेल्या असतात. म्हणजे आयुष्यात तेवढय़ा पौर्णिमा आलेल्या असतात. आता बालपणी किंवा नंतरही प्रत्येक पौर्णिमेचा चंद्र कोणी आवर्जून पाहत नाही. परंतु जीवनकाळात हजार पौर्णिमा येणं म्हणजे दीर्घायुष्याचं लक्षण म्हणून हा सोहळा साजरा केला जातो. अर्थात त्या रात्री वाढदिवस असलेल्या व्यक्तीला चंद्रदर्शन घडवलं जातंच असंही नाही. ‘सोहळा’ फक्त नात्यागोत्याच्या, स्नेही-सहृदांच्या भेटीगाठीचा ठरतो. त्यात ‘चंद्रा’चा संबंध फारच कमी येतो.अश्या प्रकारे या सहस्रचंद्र दर्शन सोहळा कार्यक्रम करण्यात येतो.नंतर त्यांच्या कुटुंबियांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित लाभली होती.आणि या कार्यक्रमात प्रत्येकाने आप आपले मनोगत व्यक्त केले.व या कार्यक्रमा प्रसंगी अण्णासाहेबांना सन्मानपत्र प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला दा.दि.शंकर पाटील एरंडोल कॉलेज चे अध्यक्ष.मा.अमित दादा पाटील, व प्राचार्य.एन.एन.पाटील सर, प्रा.बडगुजर सर, प्रा.एस.यू.पाटील सर, श्री.ज्ञानेश्वर आमले मा.जि.प.उपाध्यक्ष जळगाव , आप्पासो.ए.एल.पाटील, भाऊसो.अमृत बुधो कोळी,नानासो डॉ.पि.जी.पिंगळे,साधना मा.विद्यालय कासोदा शिक्षक व कर्मचारी वृंद,श्री.आर.के.पाटील, आबासो.गोकुळ देशमुख,युवा पत्रकार निलेश शितोळे(कासोदा) अनेक वरिष्ठ मंडळी, नेते मंडळी, व एरंडोल कॉलेज कर्मचारी,पद्मालय ट्रस्ट सेवेकरी बांधव,व महिला मंडळी,वरिष्ठ नागरिक,नातेवाईक लोक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रम अंतर्गत सगळ्या वरिष्ठ मंडळी नी आपापले मनोगत व्यक्त केले.व शेवटी अण्णासाहेबांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले,की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला या बद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो.असे म्हणत त्यांनी सगळ्यांचे आभार मानले.व
अनेकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



0 टिप्पण्या