कासोदा येथील दिनांक 23 फेब्रुवारी मंगळवार चा आठवडे बाजार बंद


प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 6 मार्च पर्यंत सर्व शाळा, महाविद्यालय ,शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्र ,खाजगी शिकवणी, कोचिंग क्लासेस ,आठवडे बाजार बंद ठेवण्याचे पालक मंत्री ना, गुलाबरावजी पाटील यांच्या निर्देशानंतर  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हे सर्व बंद ठेवण्याचे आदेश केले आहे या आदेशानुसार कासोदा येथे दर मंगळवारी भरणारा आठवडे बाजार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी बंद राहील याची नोंद घेण्यासाठी कासोदा ग्रामपंचायतने  दौंडी द्वारे जाहीर केले आहे

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या