अमळनेर प्रतिनिधी राहुल भदाणे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य तसेच विद्यानंद ऍग्रो बारामती यांचा संयुक्त विद्यमाने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेतील विषय छत्रपती शिवाजी महाराजांचे संघटन कौशल्य,छत्रपती शिवाजी महाराजांचे यांची कृषी धोरणे,शिवकालीन जलसंधारण,छत्रपती शिवाजी महाराज यांचे महिला धोरण आदी असणार आहेत.स्पर्धकांच्या वक्तृत्वाचा व्हिडिओला मिळणाऱ्या दर्शक संख्या तसेच पसंतीवरून योग्य स्पर्धकांची निवड केली जाणार असून प्रथम पारितोषिक ५००१ रुपये,द्वितीय पारितोषिक २१११ रुपये,तृतीय पारितोषिक ११११ रुपये तसेच उत्तेजनार्थ ५ पारितोषिक आयोजकांमार्फत दिली जाणार आहेत.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचा स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे यांनी केले आहे.

0 टिप्पण्या