अमळनेर प्रतिनिधी सत्तार खान
अमळनेर येथील मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनच्या वतीने अमळनेर मार्गाने जाणाऱ्या सर्व गाड्या तातडीने सुरू करावे असे निवेदन जी एम यांना देण्यात आले
अमळनेर रेल्वे स्थानकावर पश्चिम रेल्वेच्या जी एम श्री अलोक बंसल हे आले असता त्यांच्या सोबत मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष रियाज शेख यांनी चर्चा केली आणि सागितले की आमच्या तालुक 180 गांव आहेत शेतकरी मजूर आहे तसेच मजूरी साठी बाहेरगावी काम करणाऱ्यांची संख्या मोठी असुन म्हणून पॅसेंजर व लोकल शटल गाडी सुरू करण्यात यावी अश्या चर्चेतून जी एम साहेबांनी आश्वासन दिले की तुमच्या विषयाची लवकरात लवकर दखल घेऊ तसेच लेखी निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की अमळनेर मार्गावरील संपूर्ण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या सुरू करावे आणि विशेष करून पॅसेंजर गाड्या तातडीने सुरू करण्यात यावे जेणेकरुन अप डाऊन करणाऱ्यांना सोयीचे होईल तसेच प्रेरणा एक्स्प्रेस आणि अहमदाबाद पुरी सुपर फास्ट एक्सप्रेस गाड्यांना अमळनेर स्थानकावर थांबा मिळावे अशी विनंती करण्यात आली निवेदन देताना मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष रियाज शेख, भरत पवार,लोक संघर्ष मोर्चेचे पन्नालाल मावळे, शेरखा पठाण, कमर अली शाह, नविद शेख, शराफत मिस्तरी, रईस शेख राशिद शेख सह आदि बांधव उपस्थित होते

0 टिप्पण्या