कोषागर दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत अंमळनेर तर्फे सदिच्छा भेट

अमळनेर  प्रतिनिधी सत्तार खान

 अमळनेर दिनांक २ फेब्रुवारी २०२१-अखिल भारतीय ग्राहक पंचायत अंमळनेर तर्फे उपकोषागर कार्यालयात जाऊन ट्रेझरी ऑफिसर श्री लांडगे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांना कोषागार दिनानिमित्त गुलाब पुष्प देऊन सदिच्छा व्यक्त केल्यात. याप्रसंगी श्री लांडगे साहेब यांनी खरिदिविक्री व इतर कामा साठीलागणारे स्टॅम्प व तिकिटे त्यांच्या पुरवठा नियमित आहे व तो योग्य दराने ग्राहकाला विकला गेला पाहिजे असे त्यांनी सांगितले.तसेच स्टॅम्प वेंडर कार्यालयात जाऊन अध्यक्ष व सदस्यांना कोषागार दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात.  याप्रसंगी  स्टॅम्प वेंडर अध्यक्ष प्रशांत पवार, वीरेंद्र देशमुख ,मधुकर नारळे, देवीदास पाटील, गणेश येवले ,सतीश वाणी, देवदत्त संदांनशिव ,राजपूत आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अध्यक्ष एडवोकेट भारती अग्रवाल,  माजी अध्यक्ष मकसूद बोहरी, माजी सचिव विजय शुक्ला ,ऊर्जा मित्र सुनील वाघ , सौ अंजू ढवळे उपस्थित होते.


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या