निपाणे येथे 19 फेब्रुवारीला सरपंचपदाचा मान सौ सुरेखा राजेंद्र पाटील तर उपसरपंच पदाचा मान बाळू महाजन यांना मिळाला

निपाणे प्रतिनिधी

एरंडोल तालुक्यातील निपाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री संत हरिहर महाराज परिवर्तन पॅनल च्या शिवसेनेच्या सौ सुरेखा राजेंद्र पाटील तर उपसरपंचपदी बाळू सुभाष महाजन यांची बिनविरोध निवड झाली निपाणे येथे श्री संत हरिहर महाराज परिवर्तन पॅनल प्रमुख तथा माजी सरपंच संजय पाटील यांच्या पॅनलचे नऊपैकी आठ सदस्य निवडून आले आहेत दरम्यान तीन ओबीसी महिला सरपंच त्तर 5 सदस्यांना उपसरपंच पद देण्याचे संजय पाटील यांनी जाहीर केले आहे 19 फेब्रुवारीला सरपंचपदाचा मान सुरेखा राजेंद्र पाटील तर उपसरपंच पदाचा मान बाळू महाजन यांना मिळाला निवडणूक निर्णय अधिकारी पी आर वानखेडे होते तर ग्रामपंचायत सदस्य सुनीता हिम्मत वराडे संगीता भिकन पाटील शालिनी शरद ठाकूर नीलिमा समाधान ठाकूर विजय भास्कर सोनवणे सुरेखा लक्ष्‍मण भिल यांच्यासह ग्रामसेवक केडी मोरे उपस्थित होते पॅनल प्रमुख संजय पाटील श्रीधर पाटील शरद ठाकूर राजेंद्र पाटील प्रमोद बियाणी यांचे सहकार्य लाभले


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या