शिवजयंती निमित्त ससे साहेबांनी केले पाणपोईचे उद्घाटन





जळगाव प्रतिनिधी स्मशानभूमीच्या सफाई सह श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठानचा संयुक्त स्तुत्य उपक्रम  ]   शिवजयंतीनिमित्त श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज कोंबडी बाजार येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शनिपेठ पोलिस स्टेशनचे पी .आय .विठ्ठल ससे यांच्या हस्ते करण्यात आले . छत्रपती  शिवरायांचा प्रेरणा मंत्र आकाश फळे यांनी सादर केला . ' जय शिवाजी, जय भवानी ' या घोषणांनी शिवभक्तांनी परिसर निनादून सोडला.ससे साहेबांचा सत्कार  जितेंद्र दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आला .शिवजयंती प्रित्यर्थ २४ तास जलसेवा उपक्रमाचा

(पाणपोईचे) शुभारंभ करण्यात आला . कार्यक्रमास संदिप दाभाडे, राकेश लोहार, ललित खडके, किरण सोनवणे, दिनेश मिस्तरी, मुकेश कोळी, हेमंत चौधरी, हर्षल झाल्टे, राकेश तिवारी, किशोर भोसले, डॉ हितेंद्र गायकवाड , विश्व हिंदू परिषद महानगर उपाध्यक्ष हरिष कोल्हे त्यानंतर रामेश्वर कॉलनी येथील स्मशानभूमीची सामुहिक साफसफाई करण्यात आली .त्याप्रसंगी श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक  दाभाडे,जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, राहुल परकले,सुरज दायमा,निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निर्मूलन समिती जिल्हा सहसचिव विजय लुल्हे,किरण कोलते, सामाजिक कार्यकर्त्या यामिनी लोहार, सुजाता सिद्धपुरे यांनी सहभाग घेतला .उपस्थितीत सर्व नियमांचे पालन करून उपक्रम उत्साहाने राबविण्यात आला . स्मशान भुमीतील महानगर पालिकेचे सुरक्षा रक्षक कृष्णा शिरसाळे यांचा हृद्य सत्कार मी मराठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राहुल परकाळे यांच्या हस्ते करण्यात आले . तसेच साफसफाईसाठी झाडूही शिरसाळेंना सुपूर्द करुन समारोप करण्यात आला .




Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या