प्रतिनिधी जैनुल शेख
सावदा ता.रावेर येथे दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रविवार रोजी एका भव्य समारंभात जि.प.उच्च प्राथमिक उर्दू शाळा उत्राण ता.एरंडोल येथील उपक्रमशिल व विद्यार्थी हित जोपासणारे, कर्तव्यदक्ष शिक्षक *श्री.शेख फरीद शेख याकूब* यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन शैक्षणिक वर्ष 2019 - 20 साठी *महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना* कडुन *आदर्श शिक्षक* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्ष स्थानी *रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.शिरीष मधुकररावजी चौधरी* हे होते. तर विशेष अतिथी म्हणून डायमंड गृप चे मालक मा.श्री. शेख हारून इकबाल, संघटनेचे राज्य अध्यक्ष मा. श्री. एम. ए. गफ्फार, विभाग प्रमुख सैय्यद हाषिम, धुळे जिल्हाध्यक्ष रियाज अन्सारी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे राज्य सरचिटणीस श्री.गौस खान यांनी केले. कार्यक्रम यशस्विते साठी जळगाव जिल्हाध्यक्ष सैय्यद नफिस अहमद, रावेर तालुकाध्यक्ष शेख कमाल व संघटने चे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या