सामनेर तालुका पाचोरा
मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी सामनेर (ता. पाचोरा) येथे घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, इनोव्हा वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.
महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आज सकाळी 5 ते 5.30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सामनेर येथील महिला नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सामनेर ते लासगाव दरम्यान रोज ग्रामस्थ सकाळी मॉर्निंगसाठी जात असतात.
अपघात एवढा जोरदार होता की एक महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेली तर दुसऱ्या महिलेला मोटारीने 50 मीटर फरफटत नेले. दोघी महिलांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन साठी दाखल करण्यात आले. असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी पाचोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस हवालदार रामदास चौधरी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.

0 टिप्पण्या