प्रॉपर्टी नाकारत चाकूचा धाक दाखवून 23 लाख रुपयांचा ऐवज लंपास

 जळगाव-  मोहाडी रोडवर असणाऱ्या दौलत नगरात बुरखाधाऱ्यांच्या एका टोळक्याने व्यावसायिकाच्या घरात जबरीने प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत २३ लाख रूपयांचा ऐवज घेऊन पसार झाल्याची घटना आज पहाटे   घडली. 

जळगाव शहरातील दौलत नगर परिसरात पिंटू बंडू इटकरे (वय ३५) हे लोखंडी सामानाचे व्यापारी असून पत्नी आणि मुलीसह राहतात. त्यांच्या तळमजल्यावर पार्कीग असून वर दोन मजले आहेत.

 आज सकाळी सव्वातीन वाजेच्या सुमारास हे तिन्ही जण गाढ झोपेत असतांना सहा जणांनी घरात प्रवेश केला. त्यांनी इटकरेंची पत्नी  मनिषा यांना तोंड दाबून उठविले . तर पिंटू इटकरे यांना चाकू लाऊन घरात काय जे असेल ते काढून देण्यासाठी धमकावले .

घाबरलेल्या इटकरे यांनी दिलेले घरातील तीन लाख रोकड आणि २० लाखांचे दागिने घेतल्यानंतर धमकावत हे सहाही जण पसार झाले. या सहा दरोडेखोरांपैकी पाच जणांनी संपूर्ण चेहरा झाकला जाईल असा मास्क घातला होता.

 तर सहाव्याने तोंडावर विदूषकाचा मास्क लावला होता. हे चोरटे सव्वा तीन ते चार वाजेपर्यंत ते इटकरे यांच्या घरात होते. येथून पलायन करतांना त्यांनी तळमजल्यावर लावलेल्या सीसीटिव्हीचा डीव्हाआर काढून घेतला.

 तर इटकरे पती-पत्नी या दोघांचा मोबाईल घेऊन तो खाली फेकून दिला. भेदरलेल्या इटकरे दाम्पत्याने  रामानंद नगर पोलीस स्थानकात धाव घेत या प्रकरणी तकार दाखल केली.

यानंतर रामानंद नगर पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या