चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील लोकविकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे महाशिवरात्रीनिमित्त शहरातील प्रसिद्ध चामुंडा माता मंदिराजवळ,मुख्य पोस्ट कार्यालय,तसेच कामगार वस्ती परिसरात साबुदाणा खिचडी चे वाटप करण्यात आले.सामाजिक उपक्रम चा भाग म्हणून संस्थेतर्फे दरवर्षी या परिसरात फराळाचे वाटप करण्यात येते.लोकविकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे मागील वर्षी देखील कोरोना सदृश्य परिस्थितीत गोरगरीब गरजू कुटुंबांना खिचडी,पुरी-भाजी,तसेच मास्क व सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष योगेश मोरे यांनी सांगितले.यावेळी संस्थेचे सचिव सौ.भाविका मोरे, ज्येष्ठ सल्लागार विजय सपकाळे व इतर संचालक मंडळ उपस्थित होते.उपक्रम राबवितांना फिजिकल डिटन्सन्सिंग चे पालन करण्यात आले होते.

0 टिप्पण्या