पारोळा तालुक्यातून प्रथमच, शहरातील एकमेव सी.बी.एस. ई. शाळेत आज रोजी वैद्यकीय प्रवेश परीक्षा, नीट 2021-22 चे परीक्षा केंद्र होते. सदर परीक्षेसाठी एकूण 420 विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून होते पैकी 415 विद्यार्थ्यांनी परीक्षेत उपस्थिती दिली. सदर अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षाही सर्व सोशल डिस्टंसिंग व नियमांचे पालन करून बोहरा शाळेत यशस्वीरित्या पार पडली. एका वर्गात 12 विद्यार्थी प्रमाणे, 35 वर्ग खोल्यांमध्ये बैठक व्यवस्था होती व
पर्यवेक्षनासाठी 70 पर्यवेक्षक उपस्थित होते. एन .टी .ए. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत निरीक्षक म्हणून कविवर्य बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. दीपक दलाल व प्राध्यापक डॉ. जितेंद्र नारखेडे जळगाव हे उपस्थित होते तसेच सेंटर सुप्रिडेन्ट म्हणून शाळेच्या प्राचार्या सौ शोभा सोनी, व डेपुटी.सुप्रिडेन्ट विरेन्द्र सखा व कुलदीप बरहिया यांनी कार्यभार पाहिला तसेच संपूर्ण परीक्षेच्या आयोजनामध्ये रवींद्र मल्होत्रा, विजय देसले,अाविता पाटील, अनिल ठाकरे व सर्व शिक्षक वर्ग यांचे सहकार्य लाभले. संपूर्ण परीक्षा सुरक्षिततेसाठी पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, फौजदार सहाय्यक अशोक कुणबी, जयवंत पाटील, प्रदीप पाटील यांचे व बंदोबस्तासाठी उपस्थित होमगार्ड यांचे सहकार्य लाभले. आणि आरोग्य विभागाच्या वतीने कुटीर रुग्णालय पारोळा येथील आरोग्य पथक, डॉ. दिपाली बागड, आरोग्य सेविका मंगला पाटील व सुनिता मोरे हे उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व पालक वर्गाने देखील सहकार्य केले. सहकार्याबद्दल संस्थेचे चेअरमन सुरेंद्रजी बोहरा यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

0 टिप्पण्या