मदूरा मायक्रोफायनान्स लि. तर्फे सामाजिक बांधिलकी अंतर्गत आज रोजी तालुक्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि तालुक्यातील बऱ्याच गावातील कुटुंबांना त्याची झळ बसली तरी आमच्या मदुरा मायक्रोफायनान्स कंपनी तर्फे बचत गटातील सभासदांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले त्या प्रसंगी मदुराचे एरिया मॅनेजर शैलेश लोहकरे, शाखाधिकारी संदीप मानकर व सहकारी अजय झाल्टे, रेवन सहाणे,वैभव पोहनकर, अजय जाधवआणि बचत गटातील सभासद हे उपस्थित होते.
RBI मान्यताप्राप्त मदूरा कं. ग्रामीण, शहरी व निमशहरी भागातील मध्यम व गरजू महिलांच्या व्यावसायिक व आर्थिक वृद्धीसाठी उत्तम सेवा देण्याकरिता कायमच प्रयत्नशील राहिली आहे. तसेच सामाजिक बांधिलकी अंतर्गत यापूर्वीही रक्तदान शिबिर, पोलीस प्रशासनाचा सन्मान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, पूरग्रस्त मदत तसेच विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबविले आहेत.


0 टिप्पण्या