पारोळा | गौरी दिपक भावसार ने नवोदय विद्यालय परीक्षेत मिळवले सुयश

पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार
पारोळा श्री. बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचालित सौ एम.यू.करोडपती इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी कुमारी गौरी दीपक भावसार हिने शैक्षणिक वर्ष 20-21 या वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालय यात प्रवेश परीक्षा दिली होती त्यातून तिची निवड झाली असून ती प्रवेशासाठी पात्र ठरली आहे या परीक्षेसाठी तालुक्यातून 800 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यात गौरी चा नंबर लागल्यामुळे तीचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब यु एच करोडपती सर संस्थेचे सचिव डॉ.सचिन बडगुजर विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत पाटील प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील डॉ व्ही.एम.जैन माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व्हि.जे. बडगुजर यांनी अभिनंदन केले गौरी भावसार ही सेवानिवृत्त शिक्षक श्री.जी.जे. भावसार सर यांची नात तर बी. टीव्हीे संपादक दीपक जी. भावसार सर यांची कन्या असून तिला  प्रमोद मोरे  प्रदीप भावसार गौरव बडगुजर व सर्व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले तिच्या यश बद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या