[ स्व . किसन नाले स्मरणार्थ नेत्ररोग तपासणी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी महापौर जयश्री महाजन यांचे भावोद्गार ]
पंकज नाले यांची निर्लेप समाजसेवा व समर्पणशील कार्यप्रणालीमुळे जनमत प्रतिष्ठान माझाच परिवार आहे ." असे भावोद्गार महापौर जयश्री महाजन यानी काढले .ऍडव्हान्स आय केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये स्व . किसन नाले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रविवार दि. १२ सप्टेंबर २०२१ रोजी मोफत नेत्ररोग तपासणी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी जयश्री महाजन अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. स्पर्धा परीक्षा केंद्र जळगाव, शिरसोली मार्गदर्शन सुनिल सोनवणे , प्रमुख अतिथी ॲडव्होकेट हेमंत दाभाडे, सचिन सैंदाणे, ईश्वर कोळी मान्यवर उपस्थित होते . महापौर मार्गदर्शनात पुढे म्हणाल्या की, ' असेल दृष्टी तर दिलेल सृष्टी ' असे आपण म्हणतो परंतु दृष्टी असणारांना डोळसपणा नसल्याने अपरिमित वृक्ष तोडीमुळे पृथ्वीचा विनाश जवळ आला आहे . म्हणून प्रत्येक नागरिकाने पृथ्वी मातेचे ऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण करावे व आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा . सार्वजनिक स्वच्छतेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ होईल ." वृक्षारोपण व परिसर स्वच्छतेची स्वयंस्फूर्त जबाबदारी घेऊ अशी शपथ जयश्री ताईंनी उपस्थितांना देऊन नैतिकतेचे भान दिले . ग्रिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पेंटींग सहभागाची नोंद झाल्या प्रित्यर्थ कलाशिक्षक सुनील दाभाडे यांचा महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . रुग्णांची नेत्र तपासणी डॉ. राहुल महाजन व त्यांचे सहकारी डॉ. राहुल पवार यांनी केली .त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, ॲडव्होकेट हेमंत दाभाडे, शक्ती महाजन,ललित धांडे,,गणेश नाले, हर्षाली पाटील, करण राठोड, अंकिता शिंपी, गायत्री ठाकरे , राहुल कोळी, गायत्री ठाकरे , प्रकाश सपकाळ, रेडक्रॉस सोसायटीचे भरत गायकवाड उपस्थित होते . डोळे तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला . शिबीरात एकूण १०२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला .
संचालन व आभार प्रदर्शन सुनील सोनवणे यांनी केले .

0 टिप्पण्या